राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती/ राष्ट्रीय दिनाच्या यादी मध्ये मौलाना अबुल कलाम यांच्या नावाचा महाराष्ट्र शासनाला पुन्हा पडला विसर- शेख अब्दुल रहीम
सलग 5व्या वर्षीही पाठपुरावा करणार!
सिल्लड- सामान्य प्रशासन विभागाकडून 27 डिसेंबर 2024 रोजी सन 2025 मध्ये राष्ट्र पुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत एक शासन निर्णय पारित झाला त्यामध्ये भारताचे पहिले शिक्षणमंत्री तथा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीचा विसर यावर्षी ही शासनाला पडला आहे व त्यांची जयंती साजरी करण्याचा उल्लेख करण्यात आले नाही व मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्र शासनाला विसर पडला आहे आणि या वर्षीही याची पुनरावृत्ती केली आहे. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद हे भारत देशाचे पहिले शिक्षणमंत्री होते तर भारत देशाच्या स्वातंत्र्य लढा मध्ये त्यांचे महत्वाचे योगदान आहे हे महाराष्ट्र सरकारला विसरता येणार नाही. म्हणून हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांना तसेच मंत्रालयात सामान्य प्रशासनाचे मा. प्रधान सचिव, मा. सचिन कावळे सर (अवर सचिव) यांना एका निवेदनाद्वारे पुरुष/थोर व्यक्ती च्या जयंती मध्ये भारताचे पहिले शिक्षणमंत्री तथा स्वतंत्र सेनानी मौलाना अबुल कलाम आजाद यांचा ही समावेश करण्यात यावा व नवीन सुधारित जी. आर.पारित करण्यात यावे अशी मांगणी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन चे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम सर यांनी केली आहे…